भजनी मालिका
← भजनांकडे परत

महा तम अंक दाता जो मोक्षाचा । गुरुपदी साचा भाव असो

maha tam ank data jo mokshacha | gurupadi sacha bhav aso

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
महा तम अंक दाता जो मोक्षाचा । गुरुपदी साचा भाव असो ॥१॥ आनंदित मन चिंतनाचे ठायीं । मनी नसो काहीं विकल्प तो ॥२॥ पाप ताप दैन्य जातील सहज । गुरुचरणरज वंदिलीया ॥३॥ एका जनार्दनीं सदगुरुचरणीं । वृत्ति असो वाणी नाम वदो ॥४॥