भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें बहुतांसी सांगितलें संतीं । वायां हे फजिती संसार तो

magen bahutansi sangitalen santin | vayan he phajiti sansar to

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मागें बहुतांसी सांगितलें संतीं । वायां हे फजिती संसार तो ॥१॥ अंधाचे सांगाती । मिळालेसे अंध । सुख आणि बोध काय तेथें ॥२॥ विष खाऊनियां प्रचीत पाहे कोणी । तैसा अधमपणीं गुंतूं नको ॥३॥ एका जनार्दनीं जाऊं नको वायां । संसार माया लटिकी ते ॥४॥