भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागतां पैं कैवाडें । लुंची लागे मुंडे । नागवा होऊनी पुढें । उभा ठाके

magatan pain kaivaden | lunchi lage munde | nagava houni pudhen | ubha thake

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मागतां पैं कैवाडें । लुंची लागे मुंडे । नागवा होऊनी पुढें । उभा ठाके ॥१॥ मागतां फ़ाडोवाडे । घाऊनियां घोडा चढे । स्वर्ग घेऊनि वाढे । करी मारामारी ॥२॥ कलंकी होऊनि पुढें ऋणामाजीं बुडे । कलीच्या अंती घडे । कर्म ऎसें ॥३॥ मागतां दाटोदाटी । नवल त्याची गोठी । लाविली लंगोटी । एका जनार्दनीं नारदासी ॥४॥