भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागणें हेंचि माझे देवा । दुजेपा दुरी ठेवा

maganen henchi majhe deva | dujepa duri theva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मागणें हेंचि माझे देवा । दुजेपा दुरी ठेवा ॥१॥ मी तुं ऐसी नको उरी । जनार्दना कृपा करी ॥२॥ रंक मी एक दीन । माझें करावें स्मरण ॥३॥ नीच सेवा मज द्यावी । एका जनार्दनीं आस पुरवावी ॥४॥