भजनी मालिका
← भजनांकडे परत

लोभियानें धन केलें भूमिगत । दगडही थित घालूनी वरी

lobhiyanen dhan kelen bhumigat | dagadahi thit ghaluni vari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
लोभियानें धन केलें भूमिगत । दगडही थित घालूनी वरी ॥१॥ तैसे तुम्हीं देवा केलें आपणांसी । कळंक यशासी लावियला ॥२॥ बुडविलें राज्य रायें सुरापानें । नसतां सावधान राज्यकार्या ॥३॥ निळा म्हणे आळसें बुडविला संसार । न गमतां व्यवहार साउकारें ॥४॥