भजनी मालिका
← भजनांकडे परत

लावूनियां अंगा राख । म्हणती सुख आम्हांपाशीं

lavuniyan anga rakh | mhanati sukh amhampashin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लावूनियां अंगा राख । म्हणती सुख आम्हांपाशीं ॥१॥ भोळे भाविका भोंदिती । भलते मंत्र तयां देती ॥२॥ म्हणती आम्हां करा गुरु । उपचारु पूजेचा ॥३॥ एका जनार्दनीं तैं मैंद । नाहीं गोविंद तयांपाशीं ॥४॥