भजनी मालिका
← भजनांकडे परत

लावुनी आसन बैससी समाधी । तों तों उपाधी सहज लागे

lavuni asan baisasi samadhi | ton ton upadhi sahaj lage

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लावुनी आसन बैससी समाधी । तों तों उपाधी सहज लागे ॥१॥ नाममुखीं गातीं जोडे सायुज्यता । उपाधि तत्त्वतां दूरी पळे ॥२॥ घडती कोटी यज्ञयागांचें तें फळ । मुखीं रामनाम सबळ असो ॥३॥ एका जनार्दनीं जयी ऐसा नेम । तोचि पुरुषोत्तम जनामाजीं ॥४॥