भजनी मालिका
← भजनांकडे परत

लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा । देखिलासे डोळा दत्तराव

lavanya manohar premacha putala | dekhilase dola dattarav

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा । देखिलासे डोळा दत्तराव ॥१॥ चरणीं घातली मिठी प्रेम दुनावें पोटीं । पाहतां हारपली दृष्टी दुजेपणा ॥२॥ मन माझें वेधलें परिपुर्ण भरलें । एका जनार्दनीं सांठविलें हृदयीं दत्त ॥३॥