भजनी मालिका
← भजनांकडे परत

लटकीयाची आण । लटिकेंचि प्रमाण । ऎसीयासी कोण । विश्वासेल

latakiyachi an | latikenchi praman | esiyasi kon | vishvasel

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लटकीयाची आण । लटिकेंचि प्रमाण । ऎसीयासी कोण । विश्वासेल ॥१॥ मागतां बळें बळी । उदकीं देत चळी । अतिशय तळमळी । मीन जैसा ॥२॥ मागतां मांसा मासा । मुरुडूं धांवे घसा । डावेनी हातें कैसा । शंख करी ॥३॥ अतिशय कृपण । शरण एका जनार्दन । बाळा दे स्तनपान । पिलीं पोसी ॥४॥