भजनी मालिका
← भजनांकडे परत

लक्षांचे जें लक्ष तो दिसे अलक्ष । तो असे प्रत्यक्ष नंदाघरीं

lakshanche jen laksha to dise alaksha | to ase pratyaksha nandagharin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लक्षांचे जें लक्ष तो दिसे अलक्ष । तो असे प्रत्यक्ष नंदाघरीं ॥१॥ बाळरुप गोजिरें वाळे वांकी साजिरें । पाहतां दृष्टीचे पुरे कोड सर्व ॥२॥ ध्यानाचें निज ध्यान मनाचें अधिष्ठान । व्यापक विधान महेशाचे ॥३॥ एका जनार्दनीआं शब्दाची नातुडे । गौळणी वाडेंकोडें जेवाविती ॥४॥