भजनी मालिका
← भजनांकडे परत

लहानाहूनि लहान न धरी अभिमान । तेणें हो कारण सर्व बापा

lahanahuni lahan na dhari abhiman | tenen ho karan sarva bapa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लहानाहूनि लहान न धरी अभिमान । तेणें हो कारण सर्व बापा ॥१॥ उंचपणें पाहतां वेळुचीये परी । लोहाळा अंतरीं नम्र होये ॥२॥ भक्ति करतां मुक्ति संताचें संगतीं । मग मनीं विश्रांति हरी जोडे ॥३॥ एका जनार्दनीं संतांसी शरण । धरूनियां कान नाचूं द्वारीं ॥४॥