भजनी मालिका
← भजनांकडे परत

लागूनियां पायां जना विनवीत । मुखीं बोला दत्त वारंवार

laguniyan payan jana vinavit | mukhin bola datta varanvar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लागूनियां पायां जना विनवीत । मुखीं बोला दत्त वारंवार ॥१॥ तेणें तुम्हां सुख होईल अपार । दत्त दयासागर आठवावा ॥२॥ स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा । तेणें तुं अघोरा पावशील ॥३॥ एका जनार्दनीं चित्तीं दत्तपायां । दत्तरुप काया झाली त्याची ॥४॥