भजनी मालिका
← भजनांकडे परत

लागलें दैवत अक्षत सांगा । देव देऊळ आलें अंगा

lagalen daivat akshat sanga | dev deul alen anga

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लागलें दैवत अक्षत सांगा । देव देऊळ आलें अंगा ॥१॥ देव देऊळ अवघाचि देव । देखोनियां भाव लागतसे ॥२॥ जाणतां नेणतां उरी नुरे मना । यालागीं शरण एका जनार्दना ॥३॥