भजनी मालिका
← भजनांकडे परत

लडिवाळ नामा विठोबाचा दास । तयाचे चरणां दंडवत

ladival nama vithobacha das | tayache charanan dandavat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लडिवाळ नामा विठोबाचा दास । तयाचे चरणां दंडवत ॥१॥ भक्त शिरोमणी लाडका डिंगर । आवडता फ़ार विठोबाचा ॥२॥ कवित्व करुनी तारिलें सकळ । निरभिमानी निर्मळ सदोदित ॥३॥ नामावांचुनी कांहीं नेणें तो नामा । तयाचा तो प्रेमा पांडुरंगीं ॥४॥ ऐसिया संतांसीं नमन माझें भावें । एका जनार्दनीं जावें वोवाळुनी ॥५॥