भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाभ अथवा हानी करितां व्यवसाय । आम्हां कते विपाय फळां आले

labh athava hani karitan vyavasay | amhan kate vipay phalan ale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
लाभ अथवा हानी करितां व्यवसाय । आम्हां कते विपाय फळां आले ॥१॥ एका लाभा पात्र केलें तिहीं लोकीं । आम्हां नेलेंशेखीं ऐशा थरा ॥२॥ फजितीसी उणें नाहीं लोकांमाजी । अंतरविलें काजीं संसारिकां ॥३॥ नव्हता कळों आला निश्च्‍याचा भावो । येणें काळें देवो निष्ठुरसा ॥४॥ गेलें होऊनियां न चले या युक्ति । होणार ते गती हो कां सुखें ॥५॥ निळा म्हणे लाजे झाली प्राणसंधी । न ये करुणानिधी कृपा तुम्हां ॥६॥