भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुंचे पताकाचे भार । आले वैष्णव डिंगर

kunche patakache bhar | ale vaishnav dingar

कुंचे पताकाचे भार । आले वैष्णव डिंगर । भेणें पळती यमकिंकर । नामें अंबर गर्जतसे ॥१॥ आले हरिदासांचे थाट । कळिकाळा नाहीं वाट । विठ्ठलनामें करिती बोभाट । भक्तां वाट सांपडली ॥२॥ टाळ घोळ चिपळिया नाद । दिंडि पताका मकरंद । नाना बागडियाचे छंद । कवच अभेद नामाचें ॥३॥ वैष्णव चालिले गर्जत । महावीर ते अद्रुत । पुढें यमदूत पळत । पुरला अंत महादोषा ॥४॥ निवृत्ति संत हा सोपान । महा वैष्णव कठीण । मुक्ताबाई तेथें आपण । नारायण जपतसे ॥५॥ ज्ञानदेव वैष्णव मोठा । विठ्ठल नामें मुक्तपेठा । स्त्रान दान घडे श्रेष्ठा । वैकुंठ वाटा संत गेले ॥६॥