भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुल्लाळ वंशांत गोरा कुंभार । कीर्ति चराचर भरियेलें

kullal vanshant gora kumbhar | kirti charachar bhariyelen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कुल्लाळ वंशांत गोरा कुंभार । कीर्ति चराचर भरियेलें ॥१॥ प्रतिज्ञा करुनी करकमळ तोडी । भाजनेंही घडी श्रीविठ्ठल ॥२॥ नाम निरंतर वदतसे वाचे । प्रेम मी तयाचें काय वानूं ॥३॥ एका जनार्दनीं भक्ताचा कैवारी । भाजनें तीं करीं घरीं त्याच्या ॥४॥