भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षीरसागरीचें नावडे सुख । क्षीरापती देखे देव आला

kshirasagarichen navade sukh | kshirapati dekhe dev ala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
क्षीरसागरीचें नावडे सुख । क्षीरापती देखे देव आला ॥१॥ कवळी कवळ पहा हो । मुख पसरुनी धांवतो देवो ॥२॥ एकादशी देव आला । क्षीरपतीलागीं टोकत ठेला ॥३॥ द्बादशी क्षीरापती ऎकोनी गोष्टी । आवडी देतसे मिठी ॥४॥ क्षीरापती घालितां वैष्णवा मुखीं । तेणें मुखें होतसे सुखी ॥५॥ क्षीरापती सेवितां आनंदु । स्वानंदे भुलला नाचे गोविंदु ॥६॥ क्षीरापती सेवितां वैष्णवा लाहो । मुखामाजीं मुख घालितो देवो ॥७॥ क्षीरापती चारा जनार्दन मुखीं । एकाएकीं तेणें होतसे सुखी ॥८॥