भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षीरसागर सांडोनि हरि । कीर्तनी उभा सहपरिवारी । लक्ष्मी गरुड कामारी । होती तया कीर्तनीं

kshirasagar sandoni hari | kirtani ubha sahaparivari | lakshmi garud kamari | hoti taya kirtanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
क्षीरसागर सांडोनि हरि । कीर्तनी उभा सहपरिवारी । लक्ष्मी गरुड कामारी । होती तया कीर्तनीं ॥१॥ आलिया विघ्न निवारी आपण । शंख चक्र गदा हाती घेऊन । सुदर्शन कौस्तुभ मंडित जाण ॥२॥ गरुडतिष्ठे जोडिल्या करीं । लक्ष्मी तेथें कामारी । ऋद्धिसिद्धि सहपरिवारी । तिष्ठताती स्वानंदें ॥३॥ कीर्तनगजरें वाहे टाळीं । महादोषांची होय होळी । एका जनार्दनीं गदारोली । नामोच्चार आनंदें ॥४॥