भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्ण बळराम उठिले । मुखमार्जनें सारिलें । तंव दसवंतिया बोले । जेउनी जावें गोधनापाठी

krushna balaram uthile | mukhamarjanen sarilen | tanv dasavantiya bole | jeuni javen godhanapathi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कृष्ण बळराम उठिले । मुखमार्जनें सारिलें । तंव दसवंतिया बोले । जेउनी जावें गोधनापाठी ॥१॥ गाई गोवळ खोळंबले होते । पुढें गेले ते निरुते । मग आणूनियां भोजनातें । पुढें ठेविलीं रत्नताटें ॥२॥ उभयतां जेऊनियां उठिले । गोपशृंगार आणविले । विचित्र चोळणे कसिले । काचे वेष्टिले सुरंग ॥३॥ शिरीं मोरविसा टोप । कर्णीं कुंडला तेज अमूप । केशर चंदनाचे विलेप । टिळे लल्ल:टी रेखियेले ॥४॥ गुंजाहार घातले कंठी । खांदी कांबळी हाती वेताटी । मोहरी पावा गांजिवा पावा गांजिवा पाठी । माजि दिव्यान्ने भरियेलीं ॥५॥ दंडी रुमाल करीं कंकणे । पायी वाहाणा शोभलें लेणें । ऐसे चालतां अतिसत्राणें । पुढे अघयातें ओळखिलें ॥६॥ एक जाभाडें गगनावरी । दुजें पृथ्वीची ऐसें निर्धारी । गाई गोपाळ गेले भीतरीं । निळा म्हणे हें जाणवलें ॥७॥