भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपा तुमची फळा आली । बुध्दी झाली निश्चळ

krupa tumachi phala ali | budhdi jhali nishchal

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कृपा तुमची फळा आली । बुध्दी झाली निश्चळ ॥१॥ नामचि एक उच्चारिलें । तेथेंचि बैसलें मन माझें ॥२॥ इंद्रियांची पुरली धांव । बुध्दिभाव ठसावला ॥३॥ निळा म्हणे निरंतर । न पडे विसर चित्तासी ॥४॥