भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपा झाली आता आली प्रत्ययासी कैसे या मनास करूं दादा

krupa jhali ata ali pratyayasi kaise ya manas karun dada

कृपा झाली आता आली प्रत्ययासी कैसे या मनास करूं दादा ॥१॥ कैसे वज्रासन कैसे ते मनन इंद्रियांसी दमन कैसे करूं ॥२॥ कैसे करूं दादा सोहंगासी गोष्टी नासाग्री दृष्टि कैसी ठेवूं ॥३॥ रेणुमध्ये मिळे कैसी ज्ञानेश्वरा सांगा या विचारा कृपा करुनि ॥४॥ धाकुटे भावंड घेतलीसे आळ मुक्ताबाई लडिवाळ तुमची दादा ॥५॥