भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्रोधेंयुक्त पिता पुसे प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठें आहे

krodhenyukta pita puse pralhadasi | sang hrushikeshi kothen ahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
क्रोधेंयुक्त पिता पुसे प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठें आहे ॥१॥ येरु म्हणे जळीं स्थळीं काष्ठी भरला । व्यापुनी राहिला दिशाद्रुम ॥२॥ एका जनार्दनीं ऎकातांचि मात । मारितसे लाथ स्तंभावरी ॥३॥