भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण्या वियोगे गुंतला कवर्णे हातीं । परा पश्यंती मध्यमा जया धाती

konya viyoge guntala kavarne hatin | para pashyanti madhyama jaya dhati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कोण्या वियोगे गुंतला कवर्णे हातीं । परा पश्यंती मध्यमा जया धाती । श्रुति शास्त्र जया भांडती । तो कां हो रुसला श्रीपती ॥१॥ येई येई कान्हा देई आलिंगन । भेटी देऊनि पुरवीं मनोरथ पुर्ण । विरहाविरहा करी समाधान । दावी तु आपुले चरण ॥२॥ येथें अपराध आमुचा नाहीं । खेळ सर्व तुझा पाहीम । एका जनार्दनी नवल काई । एकदां येउनी भेटी देई ॥३॥