भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणें देखियेलें जग । पांडुरंगा मी नेणें

konen dekhiyelen jag | panduranga mi nenen

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
कोणें देखियेलें जग । पांडुरंगा मी नेणें ॥१॥ मौन्यें पारूषली वाणी । शब्द खाणी विसरली ॥२॥ एका आधी कैचे दोन । मज पासोन मी नेणें ॥३॥ चोखामेळा म्हणती संत । हे ही मात उपाधी ॥४॥