भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणासी न कळे अवघे जहाले मूढ । म्हणती हें गुढ वायां शास्त्र

konasi na kale avaghe jahale mudh | mhanati hen gudh vayan shastra

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कोणासी न कळे अवघे जहाले मूढ । म्हणती हें गुढ वायां शास्त्र ॥१॥ आपुलाला धर्म नाचरती जनीं । अपीक धरणी पीक न होय ॥२॥ अनावृष्टी मेग न पडे निर्धार । ऐसा अनाचार कलीमाजीं ॥३॥ एका जनार्दनीं नीचाचा स्वभाव । न कळे तया भाव कोण कैसा ॥४॥