भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण तो सोंवळा कोण तो वोंवळा । दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा

kon to sonvala kon to vonvala | dohinchya vegala viththal majha

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
कोण तो सोंवळा कोण तो वोंवळा । दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा ॥१॥ कोणासी विटाळ कशाचा जाहला । मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥ पांचाचा विटाळ येकचिये आंगा । सोंवळा तो जगामाजी कोण ॥३॥ चोखा म्हणे माझा विठ्ठल सोंवळा । अरूपें आगळा विटेवरी ॥४॥