भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण करितें समाधान । देवावीण भक्तांचे

kon kariten samadhan | devavin bhaktanche

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कोण करितें समाधान । देवावीण भक्तांचे ॥१॥ ब्रम्हसनातन पावविता । कोण या होता भक्तांसी ॥२॥ नाना कल्पनेचीं व्यसनें । तोडितें बंधनें कोण सांगा ॥३॥ निळा म्हणे जन्मजरा । यातना अघोरा न चुकत्‍या ॥४॥