भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण भाग्याचे ते लोक । केलें कौतुक तुम्हीं ज्यांचें

kon bhagyache te lok | kelen kautuk tumhin jyanchen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कोण भाग्याचे ते लोक । केलें कौतुक तुम्हीं ज्यांचें ॥१॥ वागउनियां कडिये खांदीं । निजात्मपदीं स्थापियलें ॥२॥ ज्यांचिया वचनासाठीं उडी । घालुनी तांतडी उभें ठाकें ॥३॥ निळा म्हणे दिवस राती । जयांप्रती न विसंबा ॥४॥