भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनीं स्वधर्म वाढे । कीर्तनीं जोडे चित्तशुद्धी

kirtanin svadharma vadhe | kirtanin jode chittashuddhi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कीर्तनीं स्वधर्म वाढे । कीर्तनीं जोडे चित्तशुद्धी ॥१॥ ऐसा महिमा कीर्तनाचा । शुक सांगे परिक्षिती साचा ॥२॥ होती पावन अधम जन । करितां कीर्तन कलियुगीं ॥३॥ एका त्याचा दासानुदास । जाती कीर्तनास आवडी जे ॥४॥