भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनीं प्रल्हाद तरला । बिभीषण मुक्त जाला

kirtanin pralhad tarala | bibhishan mukta jala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कीर्तनीं प्रल्हाद तरला । बिभीषण मुक्त जाला ॥१॥ ऐसा कीर्तनमहिमा । गनिका नेली निजधामा ॥२॥ तारिले वानर असुर । कीर्तनीं पावन चराचर ॥३॥ गाई गोपाळ सवंगडे । कीर्तनीं तरले वाडेंकोडें ॥४॥ अजामेळ उद्धरिला । कीर्तनीं आल्हाद भला ॥५॥ एका जनार्दनीं कीर्तन । कली कल्मष नाशीं क्षण ॥६॥