भजनी मालिका
← भजनांकडे परत

खुर्पूं लागे सांवत्यासी । न पाहे यातीसी कारण

khurpun lage sanvatyasi | na pahe yatisi karan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
खुर्पूं लागे सांवत्यासी । न पाहे यातीसी कारण ॥१॥ घडी मडकें कुंभाराचें । चोख्यामेळ्याचीं ढोरें वोढी ॥२॥ सजन कसायाचें विकी मांस । दामाजीचा दास स्वयें होय ॥३॥ एका जनार्दनीं जनीसंगें । दळूं कांडु लागे आपण ॥४॥