भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळतसे खेळ सवंगडियांसहित । गोपिकांचे हेत पुरवितसे

khelatase khel savangadiyansahit | gopikanche het puravitase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
खेळतसे खेळ सवंगडियांसहित । गोपिकांचे हेत पुरवितसे ॥१॥ जयाचिये चित्तीं जे कांही वासना । तेचि नारायण पुरविणें ॥२॥ जया जैसा हेत पुरवीं तयांचा । विकला काया वाचा भाविकांचा ॥३॥ एका जनार्दनी भाविकांच्या पाठीं । धावें जगजेठी वनोवनीं ॥४॥