भजनी मालिका
← भजनांकडे परत

खळें दान देसी भोक्तया सांपडे

khalen dan desi bhoktaya sampade

खळें दान देसी भोक्तया सांपडे । ऐसें तुवां चौखडें रुप केलें ॥१॥ ज्ञान तेंचि धन ज्ञान तेंचि धान्य । जालेरें कारण ज्ञानदेवा ॥२॥ तळवटीं पाहे तंव रचिलें दान अपार । वेदवक्ते साचार बुझावले ॥३॥ सा चार आठरे भासासी । उपरति भूसि निवडली ॥४॥ मोक्ष मुक्ति फ़ुका लाविली तुंवा दिठि । तुझा तूं शेवटीं निवडलासी ॥५॥ निवृत्ति केलें तुवां ज्ञाना । ब्रह्मीब्रह्म अगम्या रातलासी ॥६॥