भजनी मालिका
← भजनांकडे परत

खग मृग राक्षस वानर । दैत्य दानव निशाचर । सिध्दचारण विदयाधर । नागविखार कीटकादि

khag mrug rakshas vanar | daitya danav nishachar | sidhdacharan vidayadhar | nagavikhar kitakadi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
खग मृग राक्षस वानर । दैत्य दानव निशाचर । सिध्दचारण विदयाधर । नागविखार कीटकादि ॥१॥ चतुष्पदें जळचरें मनुष्ययाति । दासी वेश्या भिल्ल्णिी किती । कोळी अंत्यज अधम जाती । उध्दरिले श्रीपति सत्संगें ॥२॥ न विचारितां कुळयाति । धर्माधर्म त्यांची रीति । शरण येतांचि ते निश्चिति । निजधामाप्रति पाठविलीं ॥३॥ न म्हणोनि नरनारी बाळकें । उत्तम अधम कनिष्ठ लोकें । नामेचि पाचारितां मुखें । नेलें ते निजसुखें वैकुंठा ॥४॥ निळा म्हणे ब्रीदें चरणीं । वागवी म्हणवी भक्तांचा ऋणी । ऐसी आख्या जे वेदीं पुराणीं । तेचि रहाटी चालवी ॥५॥