भजनी मालिका
← भजनांकडे परत

कायाक वाचीक मानसीक । सदां वसे राम एक

kayak vachik manasik | sadan vase ram ek

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कायाक वाचीक मानसीक । सदां वसे राम एक ॥१॥ तो नर अथवा नारी । हो कां पतीत दुराचारी ॥२॥ सदा वसे राम ध्यानीं । आणिक कांही नाहीं मनीं ॥३॥ एका जनार्दनी जनीं । राम पाहें मनी ध्यानीं ॥४॥