भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय याचें बोलें तुज वाटतसे कोडे बोलते सांवळा अवघे वितंड

kay yachen bolen tuj vatatase kode bolate sanvala avaghe vitand

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काय याचें बोलें तुज वाटतसे कोडे बोलते सांवळा अवघे वितंड ॥१॥ पुरें तुझें गाव नको आतां वस्ती । आम्हीं जाऊं सर्व मिळुनि मथुरेप्रती ॥२॥ नाहीं तसे बोल बोलतसे वायां । एका जनार्दनीं हा तुझा कान्हया ॥३॥