भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय वर्णूं याचे गुण । ज्याचें त्रिभुवन रुपस

kay varnun yache gun | jyachen tribhuvan rupas

रचनाकार: संत निळोबा · अभंग
काय वर्णूं याचे गुण । ज्याचें त्रिभुवन रुपस ॥१॥ चंद्र सूर्य तारांगणा । दीप्ति हुताशना ज्याचेनी ॥२॥ जेणें वाड केलें गगन । दिधलें आसन वसुंधरे ॥३॥ निळा म्हणे धरिला मेरु । भरिला सागरु दिव्य क्षीरें ॥४॥