भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय वानुं हरिचा महिमा । आगमानिगमां अतर्क्य

kay vanun haricha mahima | agamanigaman atarkya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काय वानुं हरिचा महिमा । आगमानिगमां अतर्क्य ॥१॥ वेदशास्त्रें शिणोनि ठेलीं । पुराणें निवांत राहिलीं ॥२॥ दरुशनें तटस्थ होऊन । धरुनी ठेलीं तीं मौन ॥३॥ श्रुती अनुवादा जो नये । त्यासी एका जर्नादनीं ध्याये ॥४॥