भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय त्यांचा महिमा वाणूं वारंवार । हरिभक्त थोर भूमंडळीं

kay tyancha mahima vanun varanvar | haribhakta thor bhumandalin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
काय त्यांचा महिमा वाणूं वारंवार । हरिभक्त थोर भूमंडळीं ॥१॥ ज्याचिये भेटीचें आर्त ब्रम्हांदिकां । पूज्य सकळ लोकां विश्वा झालें ॥२॥ यमधर्म वास पाहे नित्य काळ । म्हणे धन्य वेळ भेटती ते ॥३॥ निळा म्हणे सर्व भाग्यें चोजविती । रिध्दिसिध्दि येती वोळंगणे ॥४॥