भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करिसी सकळ देवांचे वैभव विलास

kay karisi sakal devanche vaibhav vilas

काय करिसी सकळ देवांचे वैभव विलास । माझिया स्वामीविण ते अवघे उदास रया ॥१॥ तपन त्या कमळा कमळीं विकाशु । सुकवि मयंकुरा करिसी अरे बा सुधांशु ॥२॥ साताही वारांचे दिवसु एकियाचि सुरिजे । तैसें सर्वा सर्वपण माजीयेन श्रीराजे ॥३॥ सर्वज्ञ सुंदर देव होतुकां भलतैसे । परि जडातें चेष्टविते आणिकां पै नसे ॥४॥ जया नांव नाहीं रुप चिन्ह काहीं । नामरुप चिन्ह स्वयेंचि पाहीं ॥४॥ बापरखुमादेविवरु आहे तैसाचि पुरे । काय करिसी आणिका देवांचीं गोवरें रया ॥५॥