भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय हें दु:ख किती ह्या यातना । सोडवी नारायणा यांतोनियां

kay hen du:kha kiti hya yatana | sodavi narayana yantoniyan

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
काय हें दु:ख किती ह्या यातना । सोडवी नारायणा यांतोनियां ॥१॥ जन्मावें मरावें हेंचि भरोवरी । चौर्‍यांशीची फेरी भोगाभोग ॥२॥ तुम्हांसी करुणा न ये माझी देवा । चुकवा हा गोवा संसाराचा ॥३॥ चोखा म्हणे माझा निवारावा शीण । म्हणोनी लोटांगण घाली जीवें ॥४॥