भजनी मालिका
← भजनांकडे परत

कशी जाऊं मी वृंदावन । मुरली वाजवी कान्हा ॥धृं

kashi jaun mi vrundavan | murali vajavi kanha ||dhrun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कशी जाऊं मी वृंदावन । मुरली वाजवी कान्हा ॥धृं॥ पैलतीरीं हरी वाजवीं मुरली । नदी भरली यमुना ॥१॥ कांसे पितांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥ काय करु बाई कोणाला सांगुं । नामाची सांगड आणा ॥३॥ नंदाच्या हरीने कौतुक केलें । जाणे अंतरीच्या खुणा ॥४॥ एका जनार्दनी मनीं म्हणा । देवा महात्म्य कळेना कोणा ॥५॥