भजनी मालिका
← भजनांकडे परत

करुनियां स्नान नामा बाहेरी आला । परिसाचा मेळा घेउनी हातीं

karuniyan snan nama baheri ala | parisacha mela gheuni hatin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
करुनियां स्नान नामा बाहेरी आला । परिसाचा मेळा घेउनी हातीं ॥१॥ घेउनी परीस सांगे परिसासी । तुझा निश्चयेंसी वोळखून घेईं ॥२॥ ऐकतांचि ऐसें नामयाचें बोलणें । परी कर जोडून विनवितसे ॥३॥ ऐसा आनंदसोहळा होतसे संपूर्ण । आनंद निमग्न सर्व जाहले ॥४॥ एका जनार्दनीं आनंद पैं जाहला । आनंदानें गेला परिसा घरीं ॥५॥