भजनी मालिका
← भजनांकडे परत

करुनी हरिकीर्तन । तेथें सेविती जे अन्न

karuni harikirtan | tethen seviti je anna

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
करुनी हरिकीर्तन । तेथें सेविती जे अन्न ॥१॥ ऐसे अभागी खळ । परम चांडाळ कलीयुगीं ॥२॥ हरिकथा माउली । विकिताती अर्थभुली ॥३॥ पंच महापातक । तया घडे दोष देख ॥४॥ एका जनार्दनीं । करा कीर्तन अनुदिनीं ॥५॥