भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर्पुर अग्नीसी स्वदेहा नाशी

karpur agnisi svadeha nashi

कर्पुर अग्नीसी स्वदेहा नाशी । चंदनीं मासी न थरे देखा ॥१॥ घ्राणाची कळिका भ्रमर रुंजीका । तेथील झुळुका रुंजी करी ॥२॥ मोतियाचा चारा राजहंसा सैरा । दुजिया पाखिरा काम नये ॥३॥ ज्ञानदेव म्हणे घेती ते शहाणे । येर ते पाहुणे यमाचे रया ॥४॥