भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर्म आणि धर्म अष्टांग साधन । नको यज्ञदान नाम जपें

karma ani dharma ashtang sadhan | nako yadnyadan nam japen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कर्म आणि धर्म अष्टांग साधन । नको यज्ञदान नाम जपें ॥१॥ तुटेल बंधन खुंटेल पतन । नाममुखीं गर्जन सोपा मंत्र ॥२॥ कलियुगामाजीं सोपें हें साधन । रामनाम खुण मुक्त वाट ॥३॥ एका जनार्दनीं खुंटली उपाधी । सहज समाधि रामनामें ॥४॥