भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितां वेदशास्त्रं श्रवण । गर्वांचें भरतें होय गहन

karitan vedashastran shravan | garvanchen bharaten hoy gahan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
करितां वेदशास्त्रं श्रवण । गर्वांचें भरतें होय गहन ॥१॥ करूं जातां निजकर्म । कर्मक्रिया अति दुर्गम ॥२॥ कर्म केवळ देह असे । एका जनार्दनें तें नसे ॥३॥