भजनी मालिका
← भजनांकडे परत

करीं वो अद्वैत माला केले

karin vo advait mala kele

करीं वो अद्वैत माला केले इसन्यो सहिंवर । सिध्दपुरासि गयो । वोलु नाहीं तया दादुला भवसागरीं न सरत कीयो ॥१॥ माह्या वर्‍हाडिणी नवजणी सांगातिणी सवें बारा सोळा । अनुहात तुरे वाजोनि गगनीं जगीं जया सोहळा । मान्हा पतीपर्यंत त्याले देखि वो जग जाया आंथला ॥२॥ बाप दिन्हो ज्या घरीं त्या लेवो नाहीं । जाति ना कुळ त्यान्हा पालऊ धरि गयो तंव तो सूक्ष्म ना स्थूळ ॥३॥ बिहति बिहति मी गये तंव त्यान्हे माले धरे वो हाती । पाठिमोरा वरु वोलख्या त्याने मी बैसे पाठी ॥४॥ निरंजनीं मंडप ध्याल्यावो । लज्ञविण जाया पाणिग्रहण ब्रह्मक्षरीं । बोलीनें तंव त्यान्हे नेत्रीं दिन्हीं वो खुण ॥५॥ पांचजणी सावधान म्हणीयावो । आशा सवती अडधरी । जननिककरंडिये देहे समाविन त्यान्हे माल दिन्हे चिर ॥६॥ त्याचि सखिया मान्हीया येरि वों चौघीजन्हे । मिले सुमले येकी करोलीले । जासो यापरी चालविजे सुघरवासु ॥७॥ जान्हे सेजे मी पहुडणे तंव तो नपुंसकू वो । जया इंद्रियांविण जान्हा विस्तारु तो पुरुष जगी कैसा वो जाया ॥८॥ सोहं वो घरदारीं नांदतां बोला धन्यो येक पुत नाराज तोही योगिया चालवा व्याईसने मिवो जाया वांझ ॥९॥ पांच तान्ही वो पांच पारिठि पांच वो सत्य मान्हा पोटीं । अझुणी मी करणकुमारी वो परपुरुवेंसी नाहीं जाया भेटी ॥१०॥ मज चौघे दीर भावे राखती चौघी नणंदा आटिती । तेणें लागलें मज पिसें । बाईये वो तत्त्वमसी डोळां लेती ॥११॥ ज्यानें माझें मन सुखी जाया निरालंबीं निरंतरी । राणे रखुमाई भ्रतार श्रीकृष्ण तो म्या दिठी ठो अंतरीं ॥१२॥ दशदिशा दाही जाण दस वो अकरावें मन । बारा सोळा मान्हा सखिया वेचिवोनी निजसजन ॥१३॥ करिं वो कांकण शिरीं बासिंग दाखडाव्या पंढरपुरासि गयो । बापरखुमादेविवरु विठ्ठलु त्यांणें चरणीं समरस गयो ॥१४॥