भजनी मालिका
← भजनांकडे परत

करीं सूत्र शोभे कटावरी । तोचि हा सोनार नरहरी

karin sutra shobhe katavari | tochi ha sonar narahari

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
करीं सूत्र शोभे कटावरी । तोचि हा सोनार नरहरी ॥१॥ बरवे दिसती जानू । तेथें मिरवे पात्रा कान्हो ॥२॥ पायीं वाजती रुणझुण घंटा । तोचि नामयाचा नागर विठा ॥३॥ वाम चरणींचा तोडरु । परिसा उठतसे डोंगरु ॥४॥ दक्षिण चरणींचा तोडरु । जयदेव पदाचा तरु ॥५॥ विटेवरी चरण कमळा । तो हा जाणा चोखा मेळा ॥६॥